अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील शेतकरी ज्ञानेश्वर रावसाहेब यादव , वय ४० धंदा शेती हे त्यांच्या शेतात खत टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेवून आले तेव्हा दोघा आरोपींनी शेतात खत टाकायचे नाही , असे म्हणत विरोध केला.
तेव्हा शेत आमचे आहे मी खत टाकणार , असे म्हटल्याने ज्ञानेश्वर रावसाहेब यादव यांना लाकडी काठीने डोक्यात मारुन डोके फोडले . शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.
जखमी ज्ञानेश्वर रावसाहेब यादव यांच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारा आरोपी दादासाहेब रावसाहेब यादव , भागुबाई रावसाहेब यादव दोघे रा . कोठे कमळे श्वर यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात भादवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®