Ahmednagar News : तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना केवळ आपल्या वैयक्तिक हितसंबंधावर निधी आणून मतदार संघातील अनेक विकास कामे केली, असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
शनिवारी (दि.२४) बहाद्दरपूर येथील एका कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे बोलत होते. त्यांच्यामुळेच तालुक्याला काकडी विमानतळ मिळाले.
चाळीस वर्षात नाही एवढा निधी आपण साडेचार वर्षात मतदार संघात आणला. याचे समाधान तर आहेच परंतु अजूनही विकासाचा मोठा पल्ला गाठावयाचा आहे. त्यासाठी तुमचे पाठबळ हवे आहे.
आ. काळे म्हणाले, निळवंडेचा प्रश्न सोडून दुष्काळी भागाला पाणी मिळवून दिले, रस्त्याचे जाळी निर्माण केले, एमआयडीसी होणार असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
सरकारी योजनांचा अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला हे सर्व मतदारांनी दिलेल्या संधीमुळे शक्य झाले. त्यामुळे यापुढेही मतदारसंघाच्या विकासासाठी असेच माझ्या पाठीशी उभे रहा, अशी भावनिक साथ आमदार काळे यांनी घातली.
यावेळी बाबुराव थोरात, सरपंच गोपीनाथ रहाणे, उपसरपंच रामनाथ पाडेकर, साहेबराव रहाणे, दत्तात्रय खकाळे, शिवाजी रहाणे, प्रशांत रहाणे, भाऊसाहेब रहाणे,
नानासाहेब पाडेकर, गोपीनाथ खकाळे, आप्पासाहेब पाडेकर, साईनाथ रहाणे, बाबासाहेब रहाणे, रामनाथ रहाणे, रंगनाथ गव्हाणे,
साहेबराव खकाळे, आण्णा रहाणे, कचेश्वर रहाणे, संदीप जोरवेकर, विलास पाडेकर, भिकचंद रहाणे, बाळासाहेब रहाणे, बाळासाहेब पाडेकर,
नानासाहेब पाडेकर, वैभव सोनवणे, अमोल पाडेकर, सोमनाथ रहाणे, साईराम रहाणे, विजय कोटकर, बाळासाहेब रहाणे तसेच
गोकुळ पाचोरे, शिवाजी पाचोरे, देवराम पाचोरे, मोहनराव पाचोरे, प्रमोद पाचोरे, संदीप पाचोरे, प्रदीप पाचोरे, राजेंद्र पाचोरे, पोपट पाचोरे, शिवाजी भोसले,
शशिकांत पोकळे, नरहरी पाचोरे, अरुण पाचोरे, गणपत पाचोरे, उत्तमराव पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, लक्ष्मणराव थोरात, भास्कर थोरात, चंद्रकांत पोकळे आदी उपस्थित होते.