कौटुंबिक वादातून एकाच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून निर्घृण खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-शेतबांधाच्या रस्त्यावरुन दोन शेतकरी कुटुंबात झालेल्या वादातून एका चाळीसवर्षीय शेतकर्‍याच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गोधेगाव शिवारात मयत दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे व महेश भिंगारदे यांची शेजारी शेजारी शेतवस्ती व जमिनी आहेत.

दोन दिवसांपूर्वी बांधावरील वहिवाटीच्या रस्त्यावरून या दोन कुटुंबियांत वाद झाला. वादवादीचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी भिंगारदे यांच्या एका मुलाने दत्तात्रय ठोंबरे त्यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव मारल्याचे समजते.

कुर्‍हाडीचा घाव वर्मी लागल्याने ठोंबरे जागीच कोसळले. दरम्यान, जखमी ठोंबरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.

यातील सर्व संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाले असून मयत ठोंबरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24