अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-जामखेड नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिक व रहिवासी असा थकितकर बाकी सुमारे सव्वा आठ कोटीच्या आसपास आहे.
त्यामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून, नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत होत्या.
यासाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरून दोन दिवसांपासून कर वसुलीची मोहीम हाती घेतली. या दोन दिवसात सुमारे पाच लाख अकरा हजार रुपयांचा कर वसुल केला आहे.
व ही वसुलीची मोहिम सुरूच राहील असे मुख्याधिकारी दंडवते यांनी सांगितले. जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील व्यावसायिक गाळे धारकांकडे सुमारे आठ ते नऊ वर्षांपासूनचे भाडे थकीत होते.
एका एका गाळेधारकाकडे तर साठ ते सत्तर हजार रुपये थकित बाकी होते कधीही कर भरलेला नव्हता. या सर्व गाळे धारकांना नोटीसा पाठविल्या व जे भरणार नाहीत असे गाळे सील करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गाळेधारकांनी थकीत भाडे भरण्यासाठी सुरूवात केली.