घोडेगाव येथील म्हैस बाजार सुरू करावा – जगन्नाथ लोंढे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : घोडेगाव तालुका नेवासा येथील म्हैस बाजार सुरू करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ लोंढे यांनी केली आहे.

म्हैस व गाय बाजार गेल्या काही आठवड्यापासून लंपी आजाराच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बंद आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात जगन्नाथ लोंढे यांनी म्हटले आहे की लंपी हा आजार फक्त गायीं मध्ये आढळून येत आहे, म्हशीमध्ये याचे कुठलेही लक्षण नाही, त्यामुळे म्हैस बाजार सुरू करण्यात यावा बाजारावर अवलंबून असलेल्या शेतकरी व्यापारी व इतर घटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

आधीच पावसाचे अत्यल्प प्रमाण, दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची व इतर अवलंबून घटकांची परिस्थिती देखील बिकट झाली आहे, शासनाने या बाबीची गंभीरतेने दखल घेणे आवश्यक आहे, यामुळे तातडीने म्हैस बाजार सुरू करून शेतकरी, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक व इतर अवलंबून घटकांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा आरपीआयचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ लोंढे यांनी दिला आहे.