अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- पुणे, बीड व अहमदनगर या जिल्ह्यातून बुलेट मोटारसायकलची चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार पकडण्यात आले असून, या चोरट्यांकडून ४ लाख ८० हजार रु. किंमतीचे पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड (रा. हर्षवर्धन नगर, तपोवन रोड, अहमदनगर ), अशोक संजय गिते (रा. कडगांव, ता. पाथर्डी) हे दोघे अटक करण्यात आले आहेत,
तर एकजण फरार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शिरूर तालुक्यातील संतोष भिवा पठारे त्यांची बेळवंडी फाट्यावरील एका मंगल कार्यालयात लावलेली बुलेट मोटारसायकल अज्ञात भामट्यांनी चोरून नेली होती.
याबाबत पठारे यांनी सुपा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करत वरील दोघे ताब्यात घेतले आहेत.