अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : पारनेर, बेलवंडी, मिरजगाव व नगर तालुक्यातील घरफोडी करणारी टोळी जेरबंद !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पारनेर, बेलवंडी, मिरजगाव व नगर तालुक्यातील घरफोडी करणारी सराईत आरोपींची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. शहारुख अरकस काळे ( रा. रांजणगाव मशिद ), राजेश अशोक काळे (रा. धाडगेवाडी, ता. पारनेर) व ऋषी अशोक काळे ( रा. रांजणगाव मशिद ) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे असून,

त्यांच्याकडून २ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राम अशोक काळे (रा.धाडगेवाडी) हा आरोपी पसार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून नगर तालुका, मिरजगाव, पारनेर व बेलवंडी पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

५ सप्टेंबर २०२३ रोजी दादासाहेब गंगाराम शेळके (रा. उक्कडगाव) यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ३८० प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने फिरविला. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील शाहरुख काळे व त्याच्या साथीदारांनी सदरील गुन्हा केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली. प्राप्त माहितीनुसार सुपा येथील सोनार गल्ली शहारुख काळे याला जेरबंद करण्यात आले.

त्याने राजेश काळे व ऋषी काळे आणि राम अशोक काळे यांच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी राजेश व ऋषी काळे या दोघांनाही अटक करण्यात आली. राम काळे मात्र पसार झाला आहे.

आरोपींविरुद्ध ११ गुन्हे दाखल

घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. शहारुख काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध नगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे ५ गुन्हे दाखल आहेत. पारनेर १, श्रीगोंदा ३ व मंचर पोलिस ठाण्यात १ अशा ५ गुन्ह्याचा समावेश आहे.

तसेच राजेश अशोक काळे याच्याविरुद्धही बेलवंडी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे ३ गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे ऋषी अशोक काळे याच्याविरुद्ध आळेफाटा, हिललाईन व बेलवंडी पोलिस ठाण्यात खुनासह दरोडा, जबरी चोरी असे ३ गुन्हे दाखल आहेत.

Ahmednagarlive24 Office