अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे पाच तोळे सोन्याचे दागीने जप्त केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर (वय 25 वर्षे रा. श्रीगोंदा कारखाना ता. श्रीगोंदा) या आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मिनाबाई भ्र विष्णु बांगर यांच्या घरी रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
यावरुन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलिसांना बातमी मिळाली की, सदर घरफोडी हा ईसम नामे शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर (वय 25 वर्षे रा. श्रीगोंदा कारखाना ता. श्रीगोंदा )याने केली आहे.
पोलिसांनी सदर संशयित ईसमास ताब्यात घेवून चौकशी करण्यास सांगितले होते. त्यांनी वरील इसमास ताब्यात घेतले व त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने घरफोडी केली असले बाबत ची कबुली केले आहे. आरोपीकडुन गुन्ह्यात चोरलेले पैसे व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.