केडगावात घरफोडी; सोन्याचे दागिने व 1 लाख रुपये लांबवीले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये चाकूचा धाक दाखवत अज्ञात चोरटयांनी घरातील 22 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. शैलेश भाऊलाल ठाकूर (वय- 28 रा. मराठानगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली असून

कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश ठाकूर हे त्यांच्या कुटुंबियांसह घरामध्ये झोपलेले असताना पहाटे अडीच वाजलेच्या सुमारास त्यांचा भाऊ देवील यांनी दरवाजा वाजवून त्यांना उठवले.

शैलेश यांनी दरवाजा उघडला असता समोर त्यांचा भाऊ देवील, भावजई व चार अनोळखी इसम होते. त्यातील एकाने देवील यांचा मुलगा दक्षराज (वय 5) याच्या गळ्याला चाकू लावलेला होता.

चोरट्यांनी बळजबरीने त्यांच्या रुममध्ये घुसून कपाटाची उचकापाचक केली. कपाटामध्ये ठेवलेले 1 लाख रुपये, सोन्याची वाळी, अंगठी, मंगळसूत्र, झुबे असे 22 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24