आमदार निलेश लंके यांच्या गावात घरफोडी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  सध्या शहरीभागासह ग्रामीण भागात देखील खोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. चोरांच्या या रोज चाललेल्या लूटमारीला सर्वसामान्य पूरते बेजार झाले असून पोलिसांनी या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा कशी मागणी सर्वसामान्य करत आहेत.

नगर पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या गावात किराणा दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील सुमारे २९ हजारांचे साहित्य लंपास केले. ही घटना सुपा पारनेर रोडवरील हंगा येथे घडली.

याबाबत सविस्तर असे की, पारनेर सुपा रोडवरील हंगा हे विद्यमान आमदार लंके यांचे गाव आहे. या गावात मनिषा संतोष वाघ यांचे किराणा दुकान आहे.

दि.१९ डिसेंबर रोजी त्या नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेल्या मात्र त्या रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाचा पत्रा उचकाटून दुकानात प्रवेश केला.

त्यानंतर दुकानातील मसाल्याचे पुडे, डाळी, कॉस्मटिकच्या वस्तू, बिस्कीट पुडे, तांदळाचे कट्टे ३, गव्हाच्या पिठाच्या दोन गोण्या असा एकूण २८ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

ही बाब २० रोजी सकाळी वाघ यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी याबाबत सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुपा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोना. ओहोळ हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24