अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळील तांगडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून १ लाख ५२ हजार रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली.
याबाबत घारगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तांगडी येथे पूजा प्रवीण तांगडकर यांच्या घरी (दि.३ जून) सायंकाळी पाच ते मंगळवारी (दि. १६ जून) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला.
कपाटातील एक ते दीड तोळे सोन्याचे नेकलेस, एक तोळे सोन्याची पोत, दीड तोळे सोन्याची पोत सोन्याचे दागिने व २ एलईडी टिव्ही, जुन्या साड्या व ५२ हजार ५०० रुपये,असा एकूण एक लाख ५२ हजार पाचशे रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
घरात चोरी झाल्याचे पूजा तांगडकर यांच्या उशिरा लक्षात आले. पूजा तांगडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews