अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- महावितरणच्या वीज वाहक तारा थेट शेतकर्यांच्या शेतातून सर्वञ गेलेल्या आहेत. गेली कित्येक वर्षे या तारांमधुन वीजपुरवठा होत आहे. या तारा एकमेकाला खेटून ठिणग्या पडतात. यामुळे अनेकदा पिकांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
अशीच एका घटना पुन्हा एकदा घडली आहे. श्रीरीरामपूर तालुक्यातील टाकळीभान बेलपिंपळगाव रस्त्यावरील बल्हई नाला परिसरात विजेच्या शॉर्ट सर्कीटने लागलेल्या आगीतजवळपास 4 एकर उस जळून खाक झाल्याची घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, टाकळीभान येथील बेलपिंपळगांव रोडलगत बल्हई नाल्याजवळ गट नं. 429/1 मध्ये जयश्री शैलेश मगर यांचे सुमारे 10 एकर उसाचे क्षेत्र आहे. सदर उसास तोडणी सुरू असताना विद्युत तारांच्या शॉर्ट सर्कीटमुळे उसास आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र धुराचे व जाळाचे लोट सुरू असल्यामुळे जवळ जाणे शक्य नसतानाही आग विझविण्याचा प्रयत्न नागरिक करीत होते. यावेळी अशोक कारखान्याच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले.
मात्र खराब शिवरस्त्यामुळे सदर आग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळापासून काही अंतरावर फसली गेली. परिणामी सदर गाडीचा काहीही उपयोग झाला नाही.
नागरिकांच्या अथक प्रयत्नातून आगीवर काबू मिळविला गेला. व पुढील 6 एकर क्षेत्र आगीपासून वाचले गेले. या लागलेल्या आगीत सुमारे 4 ते 5 एकर उसाचे पिक जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.