अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : भारतीय सिमेत घुसखोरी करीत विश्वासघात करुन भारतीय जवानांवर हल्ला करणार्या चीनचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भिंगार येथे निषेध नोंदविण्यात आला.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या प्रतिमेसह चायना मालाची होळी करण्यात आली. प्रारंभी अमर रहे.. अमर रहे शहीद जवान अमर रहे!…, चायना मुर्दाबाद…, भारत माता की जय… च्या घोषणा देऊन, चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
या आंदोलनात भिंगार आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, नाना पाटोळे, रामभाऊ भिंगारदिवे, लखन आढाव, युवराज पाखरे, धनराज जाधव, डॉ.सतीश काळे, अशोक भिंगारदिवे, विजय भिंगारदिवे, सचिन साळवी, घडसिंग महाराज, प्रकाश बागुल आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अमित काळे म्हणाले की, भारतीय बाजारपेठेच्या जीवावर चायना मोठा झाला आहे. विविध निकृष्ट दर्जाच्या वस्तू कमी किंमतीत विकून आपला व्यवसाय करीत असून, भारतीय नागरिकांनी चायना मालावर बहिष्कार टाकल्यास त्यांची आर्थिक स्थिती खालवणार आहे.
चीनला धडा शिकवण्याची वेळ आली असून, चायना माल घेणार नाही व विकणार देखील नसल्याचे प्रत्येक भारतीयांनी संकल्प केल्यास खर्या अर्थाने वीर जवानांना श्रध्दांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews