अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अंकुश मधुकर जाधव (वय 31 वर्ष रा. रेणाविकर कॉलनी, घर नं 25, निर्मल नगर) यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून त्यांचे घरासमोरील टेम्पो, स्कुटी, सुझुकी मोटर सायकलला आग लावून नुकसान करणार्या महेश उर्फ मारी वाल्हेकर रा. गजराजनगर याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी अंकुश जाधव व आरोपी महेश वाल्हेकर या दोघांमध्ये दि. 2 जाने. रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास नगर औरंगाबाद रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरीत असताना वाद झाला.
यावेळी फिर्यादीस शिवीगाळ करून आरोपीने तुझ्याकडे पाहून घेतो असा दम दिला होता. दि. 3 जाने. रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या घरासमोरील टेम्पो (चक 17 इू 2037), स्कुटी मोटरसायकल (चक 24 च.5154),
सुझुकी मोटरसायकल (चक-16-घ 2997), या वाहनांना अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. ही आग आरोपीने लावली असल्याचा फिर्यादीचा संशय आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारचा पुढील तपास पोकॉ.एस.डी. मोरे करीत आहेत.