बस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; या तालुक्यात घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होताना दिसत आहे. तसेच राज्यातही सकरात्मक परिस्थिती दिसून येत आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच पारनेर तालुक्यातील एक बस कर्मचारी मुंबई हुन आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली व अखेर त्याचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ‘बेस्ट’शी करार झाल्यानंतर पारनेर आगारातून प्रत्येक आठवड्याला ५ यांत्रिक कामगार, ४० चालक व ४९ वाहक मुंबईला पाठवण्यात येतात. पारनेर आगाराच्या ३० बस मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत. लोकल सेवा बंद असल्यामुळे तेथील स्थानिक वाहतुकीसाठी या बस व कर्मचारी वापरण्यात येतात.

नेहरूनगर (कुर्ला) येथून या बसच्या वाहतुकीचे नियमन केले जाते. त्यामुळे वाहक, चालक, तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय तेथे करण्यात आली आहे. मुंबईत एक दिवस काम केल्यानंतर या कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला पारनेर येथे पाठवले.

त्याची कोरोना तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली, पण मधुमेहाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याला नगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. पुन्हा कोरोना चाचणी केली तर ती पॉझिटिव्ह आली. आठ दिवसांच्या उपचारांनंतर बरे वाटू लागल्याने घरी पाठवण्यात आले.

पुन्हा तब्येत खालावल्याने नगरला दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दरम्यान, मुंबईला जाऊन आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १२ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24