दहा लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण! कोपरगाव पोलिसांनी केली चौघा आरोपींना अटक!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोपरगाव शहराच्या मध्यवस्ती भागातल्या गांधी पुतळा परिसरात असलेल्या बाल गणेश किड्स वेअरचे मालक श्रीकृष्ण बबनराव पवार

[रा. समता नगर, ता. कोपरगाव] आणि कामगार शफिक उद्दीन शेख [रा. दत्तनगर ता. कोपरगाव] या दोघांचे अपहरण केल्या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केलीय.

श याप्रकरणी बबनराव बाळाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन राजेंद्र कुसुंदल [रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव], सचिन संजय साळवे [रा. गजानननगर, कोपरगाव], आकाश विजय डाके

[रा. गोकुळनगरी, कोपरगाव], शुभम केशव रागपसरे [रा. कोर्ट रोड, कोपरगाव] यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गांधी पुतळा परिसरात स असलेल्या बाल गणेश किड्स वेअरचे मालक आणि दुकानात कामाला असलेल्या कामगाराचे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारमधून

[ क्र. एम. एच. १२ एन. बी. २४८२] आलेल्या आरोपींनी कृष्णा पवार आणि शफिक उद्दीन शेख यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना शिर्डी येथील हॉटेलमध्ये दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली.

त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या पथकाने सापळा रचत या चार आरोपींना अटक केली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24