अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी सीए अंदानी याला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी सीए शंकर अंदानी याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (१४ फेब्रुवारी) अटक केली होती.

पोलिसांनी अंदानी याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने शंकर अंदणी यास ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तो आता २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडीत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. नगर अर्बन घोटाळा प्रकरणात एकूण १०५ आरोपी आहेत.

त्यातील आता माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी यास अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी अध्यक्षांसह दोन संचालकांना या आधीच अटक करण्यात आलेली आहे.

त्यांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे बदली झाली असून सध्या हा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर मिटके यांनी नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्याच्या तपासाला प्राधान्य देत धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.

संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानेच अंदानी यास अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा बँकेचे ठेवीदार मोठ्या संख्येने तेथे आलेले होते.

दरम्यान आता पोलीस उपाधीक्षक मिटके यांची एकंदरीत कामगिरी पाहता त्यांना डॅशिंग ऑफिसर म्हणून ओळखले जाते.

त्यामुळे ते या प्रकरणातही धडाकेबाज कामगिरी करत ठेवीदारांना न्याय देतील अशी आशा ठेवीदारांमध्ये निर्माण झालेली आहे.

त्यांनीही पदभार घेतल्यानंतर य याप्रकरणात लक्ष घालत प्राधान्यक्रमाने हा विषय हाताळण्यास सुरवात केल्याचे दिसते.

Ahmednagarlive24 Office