त्या झेडपी सभापतींचे संचालक पद रद्द करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील पोखरी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक व जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणी संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश गाजरे यांनी केली आहे.

गाजरे यांनी या सबंधीचे निवेदन पारनेरचे साह्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी यांना दिले आहे. दरम्यान गाजरे यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, पोखरी येथील सेवासंस्थांमध्ये दाते संचालक पदावर कार्यरत आहेत.

परंतु १० सप्टेंबर, १३ सप्टेंबर व १६ सप्टेंबर रोजी या सेवा संस्थेचे झालेल्या मिटींगला संचालक काशिनाथ दाते यांच्यासह इतर तीन संचालकही अनुपस्थित असल्याची नोंद प्रोसिडिंग पुस्तकांमध्ये करण्यात आलेली आहे.

त्यामुळे या तीन बैठकांना गैरहजर राहिल्याबद्दल जि.प.चे‌ सभापती व सेवा संस्थेचे संचालक काशिनाथ दाते यांचे पद रद्द करावे अशी लेखी मागणी प्रकाश गाजरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी प्रकाश गाजरे, बाळासाहेब शिंदे, पंडित महादु पवार, तुकाराम शिंदे, अशोक करंजेकर, कुंडलिक पवार आदी उपस्थित होते.

दरम्यान सभापती काशिनाथ दाते यांनी या आरोपाचे खंडन केलं आहे. सहकार कायद्याप्रमाणे तीन सलग मासिक बैठकांना गैरहजर राहिला तर सेवा संस्थेच्या संचालक पद रद्द करता येते. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या काही एकाच महिन्यात तीन बैठका घेण्यात आल्या होत्या त्या सभासद शेतकऱ्यांच्या कर्ज मंजुरीसाठी सेवा संस्थेच्या सचिवांनी घेतलेल्या आहेत.

त्यामुळे सहकार खात्याला संचालकाचे पद रद्द करता येणार नाही परंतु यावरून विरोधकांचा बालीशपणा अज्ञान उघड झाले असून इतर आरोपांचे दाते यांनी खंडन केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24