Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात आचारसंहिता सुरू होती व यामुळे अनेक सरकारी कामांना ब्रेक लागल्याची स्थिती होती. अगदी याचप्रमाणे गेल्या 14 महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या पदभरतीतील काही जागांसाठी देखील आचारसंहितेमुळे ब्रेक बसलेला होता.
परंतु आता राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या व त्यामुळे आता आचारसंहिता संपल्याने रखडलेल्या या पदभरतीला पुन्हा एकदा वेग येणार असून आचारसंहितेमुळे ज्या काही उर्वरित पदांसाठी उमेदवारांच्या नियुक्ती रखडल्या होत्या त्या आता देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने लवकरात लवकर आता उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहेत.
जर आपण आतापर्यंत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या पदभरतीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर एकूण 937 पदांकरिता परीक्षा झालेली होती व तिचा निकाल देखील जाहीर करण्यात आलेला होता.
त्यातील जवळपास 466 उमेदवारांना जिल्हा परिषदेने नियुक्ती देखील दिली आहे व त्यातील 60 ते 70 जागांवर मात्र पात्र उमेदवार मिळालेले नाहीत.यामुळे अजून चारशे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
कशी आहे आतापर्यंतची जिल्हा परिषद नोकर भरतीची स्थिती?
आतापर्यंत अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत 1937 पदांसाठी परीक्षा झालेली असून तिचा निकाल देखील जाहीर करण्यात आलेला आहे व त्यातील जवळपास 466 जणांना जिल्हा परिषदेने नियुक्ती दिलेल्या आहेत.
परंतु अजून देखील जवळपास 400 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकोणावीस संवर्गातील 937 पदांकरिता पाच ऑगस्ट 2023 रोजी नोकर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
यातील काही पदांची परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये तर काही संवर्गांची परीक्षा जुलै 2024 पर्यंत झाली. या झालेल्या सगळ्या परीक्षांचा निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर देखील करण्यात आलेला होता. यातील ऑगस्ट 2024 मध्ये निकाल लागलेल्या सात संवर्गातील एकूण 43 उमेदवारांना निवड पत्र देखील देण्यात आलेले होते.
यामध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त अर्ज आरोग्य सेवक( पुरुष 50% हंगामी फवारणी ), आरोग्य सेवक( पुरुष इतर 40%), आरोग्य परिचारिका तसेच कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा संवर्गातील एकूण 763 पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक उशिरा जाहीर झाल्यामुळे या परीक्षा 30 जुलै 2024 रोजी पूर्ण झाल्यावर या पदांचे निकाल उशिरा म्हणजे 30 ऑगस्टला लागले.
त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा परिषद प्रशासनाने उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली व निवड याद्या देखील प्रसिद्ध केल्या व त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात 285 आरोग्य सेविकांना नियुक्ती देखील देण्यात आली.
म्हणजेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने शक्य तेवढ्या उमेदवारांना नियुक्त देण्याचा प्रयत्न केला व अजून 400 जणांना नियुक्ती देणे बाकी आहे. आता आचारसहिता संपली असून त्यामुळे राहिलेल्यांची कागदपत्र पडताळणी व इतर कामे महिनाभरात करून नियुक्तीसाठी राहिलेल्या उमेदवारांना देखील नियुक्ती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.