अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. तर ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. दरम्यान अर्ज माघारीनंतरच ग्रामपंचायत निवडणूकचे चित्र होणार स्पष्ट होणार आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरले, अर्ज छाननी झाली आता अर्ज माघारी घेण्याची तारीख उद्यावर आली आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे.
त्यानंतर मात्र एकीकडे पॅनल नक्की केले जाणार असून त्यानंतर नेमके कोणकोणत्या पॅनलमध्ये व कोणत्या वार्डमध्ये निवडणूक लढवणार हे नक्की होणार आहे.
यामध्ये अर्ज मागे घेताना मात्र खूप त्रास होणार आहे. मिरजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत एका एका उमेदवाराने अनेक अर्ज दाखल केले आहेत.
यात केवळ पॅनलची सोय म्हणून काही उमेदवारांनी अनेक वार्डात अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी अनेकांचे अर्ज उद्या माघारी घ्यावे लागणार आहेत.
यात एक उमेदवार एकाच वार्डात उमेदवारी अर्ज ठेवणार आहेत. त्यानंतर एकास एक उमेदवार निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकणार आहेत.
त्यानंतर उमेदवारांचे पॅनल नक्की होणार आहेत. मात्र यात अनेकजनाचे स्वतंत्र अर्ज भरले असल्याने असे काही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाहीत,
असे उमेदवार स्वातंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे मिरजगावमधील ही ग्रामपंचायतीची निवडणूक दुरंगी व तिरंगी होणार आहे हे निश्चित आहे.