श्रीरामपूरात आज सकल मराठा समाजाचा कँडल मार्च

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज बुधवारी (दि. १) सायंकाळी ६.३० वाजता हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशन, श्रीरामपूर येथून कॅन्डल मार्च निघणार असल्याचे सकल मराठा समाज श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

सकल मराठा समाजाने याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढाई पुन्हा सुरू केली आहे. जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज आरक्षणाच्या लढाईत उतरले आहे.

पहिल्या टप्यात श्रीरामपूर शहर बंद यशस्वीपणे करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात शहरातील प्रशासकीय भवन तसेच गावोगावी साखळी उपोषण करत मराठा समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात आपली लढा तीव्र केला आहे.

याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेत कॅन्डल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आज बुधवारी (दि. १) होणाऱ्या कॅन्डल मार्चची सुरवात रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिर येथून होणार असून मेनरोड,

बेलापूर रोड कॅनॉल पुल, छत्रपती संभाजी राजे चौक मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज रोड येथे नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून गांधी पुतळा येथे समारोप करण्यात येणार आहे.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.