Ahmednagar News : अपघातांची मालिका सुरु असतानाच आता आणखी एक अपघाताचे वृत्त अहमदनगर मधून आले आहे. कार दुचाकीच्या भीषण अपघातात निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावरील लोखंडी फॉल येथे भरघाव कारने जोराची धडक दिल्याने सेवानिवृत्त शिक्षकाचा झाल्याची मृत्यू घटना काल सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव (कारवाडी) येथील भारत सर्व सेवा संघाचे सेवानिवृत्त शिक्षक संभाजी कोंडीराम गायकवाड (वय ६७) असे मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
गायकवाड हे सकाळी आठ वाजता आपल्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी क्रमांक (एम.एच.१७ ए.एच. ५२८) वरुन लोखंडी फॉल जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपा कडे गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जात असताना श्रीरामपूरकडून नेवासाकडे जाणाऱ्या भरधाव हुंदाई क्रेटा कंपनीच्या कार (क्रमांक एम. एच. १६- बी.एच. ७६६७) ने गायकवाड यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात संभाजी गायकवाड हे गंभीर जखमी झाले. घटनास्थाळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी मदत कार्य करत गायकवाड यांना पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथे रुस्रणालयात घेऊन जात असताना खोकर फाट्याजवळच त्यांची प्राणज्योत मालवली.
अपघाताची माहिती टाकळीभान दुरक्षेत्राचे पो.हे.काँ. अर्जुन बाबर यांना मिळताच त्यांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली.
याबाबत उशिरापर्यत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेचा पुढील तपास पो.हे.काँ. बाबर करत आहेत.
श्रीरामपूर ते नेवासा या राज्यमार्गाचे नुकतेच नुतनीकरण झाले असल्याने वाहनांचा प्रचंड वेग वाढलेला आहे. लोखंडी फॉल ते पेट्रोलपंप या रस्त्यावर उतार असल्याने वाहनांचा वेग अधिकच वाढलेला असतो.
या परीसरात वारंवार अपघात होवून निरपराधांना किंमत मोजावी लागत असल्याने पेट्रोलपंप परीसरात गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत.