कारची दुचाकीस धडक,एक ठार, एक जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- इको कारची दुचाकीस मागून धडक बसून झालेल्या अपघातात मारूती पनू थोरात (वय ६१) जागीच ठार झाले, तर दत्तात्रेय गायकवाड गंभीर जखमी झाले. नगर-पुणे मार्गावर पळवे शिवारात हा अपघात झाला.

मृत व जखमी पानोली येथील रहिवासी आहेत. यासंदर्भात मारूती थोरात यांचे जावई अविनाश भगत यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

दत्तात्रेय थोरात यांच्या दुचाकीवर (एसएच १२ एमजी ६५९३) दत्तात्रेय थोरात व मारूती थोरात हे पानोलीहून सुप्याकडे येत होते.

पळवे शिवारात पाठीमागून येणाऱ्या इको कारची (एमएच १६ एजे १९३५) त्यांच्या दुचाकीस धडक बसली. मारूती थोरात जागीच ठार झाले, तर दुचाकी चालक दत्तात्रेय गायकवाड गंभीर जखमी झाले. अपघातानंतर इकोचालक पसार झाला.

अहमदनगर लाईव्ह 24