सावधान नगरकर ! राजरोसपणे केमिकलयुक्त भेसळ असलेले दूध विकले जात आहे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेली कित्येक दिवसांपासून राजरोसपणे केमिकलयुक्त भेसळ असलेले दूध विकले जात आहे. अनेक दुकानांमध्ये तसेच छोट्या दूध डेअरीमध्ये राजरोसपणे केमिकल युक्त भेसळ दूध विकले जात असून

शहराच्या लगत असणाऱ्या खेड्यापाड्यातून आलेल्या दूधवाल्यांकडून दूध घेऊन भेसळ करून ते विक्री केली जाते. तरी हे दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करावी.

अशी मागणी जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्यावतीने दिला आहे. तसेच या मागणीसाठी दि. २० सप्टेबर रोजी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे.

शहरामध्ये दुधाचे पिण्याचे प्रमाण हे छोटी मुले, वृद्ध लोक हेच आहे. वयोवृद्ध व वृद्ध लोक हेच आहे. वयोवृद्ध व लहान मुले दूध पिऊन आजारी पडत आहेत. संबंधित खात्याचे मंत्री वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही.

सर्वांचे आर्थिक हितसंबंध असल्याने शंका निर्माण होत आहे. हे भेसळयुक्त दूध तयार करून लहान मुला मुलींना त्यांच्या कुटुंबीयांना विषारी दूध पाजत आहे. तरी या दूध भेसळी बाजारावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी २० सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे पाटील हे उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.