अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी आणखी ५ कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ७ झाल्याने कोळगाव परिसरात तसेच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कोळगाव येथील धार्मिक स्थळी एक तरुण तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित सापडला होता. त्याच्या संपर्कात आलेले काही जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
त्यातील दोन पुरुष आणि तीन महिलांचे नमुने पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील पांढरेवाडी येथील 55 वर्षीय वृध्द महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली असताना
दि.3 जुलै रोजी आणखी एक 45 वर्षीय तरुणाला कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्या नंतर त्याच्या संपर्कातील एकूण १९ जणांना क्वारंटाईन करून
त्यांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा तपासणी अहवाल रात्री उशिरा आल्यानंतर १९ पैकी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews