पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी २० जणांवर गुन्हा : १० आरोपी अटकेत

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शुक्रवारी श्रीरामपूर शहरात मिरवणुकीमध्ये बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेल्या दगडफेक प्रकरणी २० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. शुक्रवारी रात्री संदल मिरवणुकीत हा प्रकार घडला होता. पोलीस इतर आरोपींच्या मागावर आहेत.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास संदल मिरवणूक शिवाजी चौकात आली होती. यावेळी मिरवणूक बराच वेळ एकाच ठिकाणी राहिली.

‘एकाच ठिकाणी जास्तवेळ थांबू नका,’ असे सांगायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही तरुणांनी दगडफेक केली. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवला होता.

याप्रकरणी राहुल बाजीराव खेडकर (नेमणूक, नगर मुख्यालय) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe