जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.

वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे.

दरम्यान नुकतेच संगमनेर लोणी रस्त्यावर समनापूर गावच्या शिवारात टेम्पोत जनावरे भरून कत्तलीसाठी जाणाऱ्या एकाला संगमनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडले पाठलाग करत पकडले आहे.

याप्रकरणी एकाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक मोहमंदएजाज इसाक सौदागर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे १२ जनावरांना जीवदान मिळाले आहे.

३ लाख रुपये किमतीचे १२ जनावरे व ६ लाख ५० हजार रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय पवार अधिक तपास करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24