वायुदलातील माजी सैनिकांचा सन्मान करुन एअरफोर्स डे साजरा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- भारतीय लष्करात महत्त्वाचा घटक असलेल्या वायुदलाचा 88 वा स्थापना दिनानिमित्त शहरातील वायुदलात कर्तव्य बजावलेल्या माजी सैनिकांचा विश्‍वशाली व स्नेह 75 ग्रुपच्या वतीने सन्मान करुन एअरफोर्स डे साजरा करण्यात आला.

एअरफोर्स डे निमित्त गुलमोहर रोड, पारिजात चौक येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात वायुदलातील माजी सैनिक अ‍ॅड.शिवाजी डमाळे, रमेश शेजूळ, अरविंद सुद्रीक, नारायण घुले यांचा सत्कार विश्‍वनाथ पोंदे यांनी केला. यावेळी माजी सैनिक शिवाजी पालवे, डॉ. विनोद सोळंकी, डॉ. प्रविण रानडे, अरुण खिची, शिवाजी गर्जे आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात विश्‍वनाथ पोंदे यांनी भारतीय वायूसेनेचे कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. देशाकरीत त्यांचे योगदान मोठ्या जबाबदारीचे असल्याचे त्यांनी सांगितले. अरविंद सुद्रिक यांनी 8 ऑक्टोबर 1932 रोजी वायुसेनेची मुहुर्तमेढ रोवली गेली. आज वायुदलात मोठा बदल होऊन विश्‍वातील शक्तीशाली वायुदल सेना म्हणून भारताकडे पाहिले जाते.

यामध्ये 80 टक्के टेक्निकल विभाग योगदान देत असून, अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून वायुदलाकडे पाहिले जाते. युध्दात वायुदल महत्त्वाची भूमिका बजावतो तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील हा दल कार्यरत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटीश राजवटीत रॉयल एअरफोर्स असतित्वात होते.

स्वातंत्र्यनंतर भारतीय वायुसेनेचा उदय झला. नॅट व हंटर ही छोटी विमानांच्या ताकतीवर भारताने आज रशियाशी करार करुन मिग व त्यानंतर राफेल हे अद्यावत लढाऊ विमान वायुदलामध्ये समावेश केले आहे. भारतीय वायुसेना जगामध्ये शक्तीशाली असून, पायलट व टेक्निशियन हे वायुदलाचे दोन खांब आहेत.

वायुदल हे सर्वात जबाबदारीचे व धोक्याचे काम करत असतो. पायलट घडायला विमानापेक्षा अधिक किंमत लागत असल्याचे सांगून वायुदलातील टेक्निकल विभागाचे अनुभव विशद केले. नारायण घुले यांनी वायुदलाचा सैनिक कोणत्याही क्षेत्रात प्रगती साधतो. त्याची बुध्दीमत्ता प्रखर असते. शिस्तबध्द माणुस वायुदलात घडत असतो.

एक वेगळे संस्कार त्यामध्ये रुजत असते. भारतीय सेनेत काम करणे हे भाग्याचे लक्षण असल्याचे सांगितले. शिवाजी पालवे यांनी सैनिक आपल्या जीवनातील तरुणपणाची वेळ देशासाठी देत असतो. मोठ्या निष्ठेने ते देशसेवा करीत असतात. प्रत्येक नागरिकांनी त्यांच्याप्रती आदर ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24