अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-सण असो किंवा उत्सव नेहमीच बंदोबस्तासाठी सज्ज असलेले व आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणार्या ड्युटीवर नेमणुकीस असलेल्या पोलीसाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
नगर तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल नरेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अ.भा. वारकरी मंडळ मंदीर कमिटीचे तालुका प्रमुख विजय भालसिंग यांनी सत्कार करुन त्यांच्या कार्यास सलाम केले.
यावेळी महिला हेड कॉन्स्टेबल अमिना शेख, हेड कॉन्स्टेबल राजेद्र ससाणे, महिला पोलीस नाईक प्रमिला गायकवाड आदी उपस्थित होते. विजय भालसिंग म्हणाले की, पोलीसांनी कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रत्येक सण, उत्सव व संकटसमयी पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांचा वाढदिवस असो किंवा काही आनंदक्षण त्यापेक्षा कर्तव्याला महत्त्व देऊन ते आपली ड्युटी करीत असतात. अशाच पोलीस दलातील कर्मचार्याचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved