जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाच्या सरी पुन्हा एकदा जोरदार कोसळू लागल्या आहेत..
यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात पाण्याची चांगलीच वाढ झाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी महसूल मंडलात एकच दिवसात १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ११४. ४ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील विविध महसूल मंडलात पावसाने दमदार हजेरी लावली असून यात सर्वाधिक पावसाची नोंद ही वांबोरीत १०७ मिलीमीटरची आहे.
तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत जिल्ह्याची चेरापुंजी असणाऱ्या अकोले तालुक्यापेक्षाही सध्या पाथर्डी तालुक्यातील पावसाची सरासरी अधिक आहे.
अकोले तालुक्यात जून ते सप्टेंबर सरासरी ७५१.६ मिलीमीटर तर पाथर्डी तालुक्यात ७७७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
जाणून घ्या जिल्ह्यातील काही भागातील पावसाच्या नोंदी
भिंगार ३०.८
नागापूर २१.५
जेऊर २१.३
पारनेर ३८.५
सुपा ४४
मांडवगण (श्रीगोंदा) ३९.५
पाथर्डी ४८
माणिकदौंडी ३७.५
टाकळीमानूर ३६
करंजी ५५.३
वांबोरी १०७
ब्राम्हणी ५८
सोनई ४४.८
चांदा ३७.२