अहमदनगर बातम्या

चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने मागितली खंडणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागितल्या प्रकरणात मालवणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मालवणी पोलिसांनी या प्रकरणात सिनेसृष्टीतील तीन जणांना अटक केली आहे. दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशा कि, वरील आरोपींनी मुंबईतील मड परिसरातल्या एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि याचा व्हिडिओ व्हायरल केला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला राज ठाकरेंचं नाव घेत एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. राज ठाकरेंना तू ओळखत नाहीस का? काम कोणासाठी करतोस आणि महाराष्ट्रात,

मुंबईत कसा राहतोस? असे सवाल करत आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापैकी तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक महिला रात्र असल्याने पोलीस ठाण्यात आली नाही. त्या महिलेला नोटीस बजावण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office