अहमदनगर बातम्या

चक्क पोलीस ठाण्यासमोरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्याने लांबवीले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- संगमनेर शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोरुन जात चोरट्यांनी मूळच्या वसईत राहणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीसह सोन्याचे पदक लांबविले आहे.

याबाबत अधिक ताहिती अशी कि, मूळच्या वसईत राहणार्‍या मनीषा रामनाथ वाघ या कामानिमित्त संगमनेरात आल्या होत्या. पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याने क्रीडा संकुलाकडे जात असताना

संजय गांधी नगर वसाहतीसमोर पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून धूम ठोकली. या प्रकारानंतर त्या महिलेने आरडाओरड केल्याने

आसपासच्या काही नागरिकांसह पोलीस ठाण्यातील काही कर्मचारीही चोरट्यांच्या मागे धावले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी सायंकाळी उशिराने शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत शहरासह संगमनेर तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातही संगमनेर शहर पोलीस ठाणे

आघाडीवर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत संगमनेर शहर हद्दीतील गंभीर गुन्ह्यांच्या आकडेवारीत तब्बल 52 टक्के चिंताजनक वाढ झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office