अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-हॉस्पिटलमधून जेलमध्ये घेऊन जात असलेल्या आरोपीच्या खिशात पोलिसांना मावा, सिगारेट, बिडी आणि गांजा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बाळू ऊर्फ बाली मच्छिंद्र खरात असे आरोपी कैद्याचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी तोफखाना पोलिसांत संबंधित कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळू खरात हा विनयभंग आणि बालकाचे लैगिंक शोषण प्रतिबंध कायद्याखाली अटकेत आहे. अटकेतील बाळू खरात हा न्यायालयीन कोठडीत आहे.
त्याच्यासह सहा कैदी सिव्हिल हॉस्पिटलच्या कैदी वार्डात होते. पोलीस कैदी वार्डातील आरोपींना घेऊन सबजेलकडे निघाले. सबजेलमध्ये कैदी घेण्यापूर्वी नियमानुसार मल्लिकार्जुन केगाव यांनी बाळू खरात या आरोपींची झडती घेतली.
झडतीनंतर पाच कैदी सबजेलमध्ये घेतले गेले. बाळू खरातची पोलिसासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे चिलीम, चिलीमीत ठासून भरलेला गांजा, सिगारेट, बिडी, मावा पुढ्या आढळून आल्या.
सबजेल एसपींनी त्याला जमा करून न घेता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी पत्र पोलिसांना दिले. त्यानंतर आरोपी खरात यास घेऊन पोलीस तोफखाना पोलिस ठाण्यात पोहचले.
दरम्यान बाळू खरात विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून खरातला अटक केली आहे.