अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-प्रेमदान चौकातील हॉटेल न्यूपंचरत्न समोर बेकायदा तलवार बाळगणार्या प्रवीण रमेश कांबळे (वय 32 रा. बोरुडे मळा बालिकाश्रम रोड) याचेवर तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मा अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग अहमदनगर विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन सुनील गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.उप. निरीक्षक/ समाधान सोळंके,
अविनाश वाकचौरे, अभंग, वसीम पठान, ज्ञानेश्वर मोरे, अहमद इनामदार, दत्तात्रय कोतकर, सचिन जगताप, धीरज खंडागळे, शिरीष तरटे यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे.