अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील लोणी बु. परिसरात सोनगाव रोड भागात राहणाऱ्या एका ३२ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीस ती घरी एकटी असताना आरोपी मनोज मोहन उदावंत याने तुला भेटायचे आहे. तुझ्याशी बोलायचे आहे.
तू मला खुप आवडते, असे म्हणून ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग केला. यावेळी पिडीत विवाहितेचा पती जाब विचारण्यास गेला असता त्याला आरोपी मनोज उदावंत याने मारहाण करुन
नीता मनोज उदावंत हिने डोक्यात काठी मारुन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. दुपारी ३ वा. हा प्रकार घडला. काल याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून
आरोपी मनोज मोहन उदावंत व निता मनोज उदावंत (दोघे रा. सोनगाव रोड लोणी बु.) याच्याविरुद्ध लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सफौ घोडे हे करीत आहे.