फसवणूक प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  एका संस्थेची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी काँग्रेसच्या एका नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा खळबळजनक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे.

फसवणुकीच्या या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. संस्थेची व धर्मदाय आयुक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील काँग्रेसच्या नगरसेविका शबाना रईस बेपारी यांच्यासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, करीम इस्माईल तांबोळी (रा. वडगावपान) यांनी अलाईन्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती, तसेच त्यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम केले.

त्यांनी संगमनेरात भाडेतत्वावर जागा घेत इंग्लिश स्कूल सुरू केले. 2007 साली संस्थेच्या विश्वस्त मंडळातील तिघांनी राजीनामे दिले. यानंतर विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज सादर करण्यात आला होता.

नवीन विश्वस्त मंडळात उपाध्यक्षपदी नजीर तांबोळी, सचिवपदी वसीम तांबोळी, महंमद खान, मुशरफ खैरादी यांना विश्वस्त करण्यात आले. तर हंगामी अध्यक्ष म्हणून करीम तांबोळी यांनी पदभार स्विकारला होता.

दरम्यान संस्थेचे अध्यक्ष करीम तांबोळी यांचे निधन झाले. संस्थेचे ज्या ठिकाणी खाते होते त्या बँकेच्या पत्रावरुन कोणीतरी खात्यावरील सह्या बदलवण्यासाठी अर्ज केला.

तो अर्ज तपासला असता त्यावर संस्थेचे अध्यक्ष म्हणून रईस अहमद शेख यांचे नाव होते. त्यांनी बनावट कागदपत्रे, सही शिक्के बनवून विश्वस्त मंडळ तयार केले होते.

बनावट कागदपत्रांच्या आधारे पदे नेमण्यास त्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज केला होता. या प्रकारामुळे नजीर तांबोळी यांनी न्यायालयात दाद मागितली.

न्यायालयात चौकशी झाल्यानंतर नगरसेविका शबाना बेपारी, रईस शेख, जावेद शेख, महंमद जावेद जावेद हुसेन (रा.अलकानगर) असा चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, त्यानुसारसंगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24