अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील सोनई- बेल्हेकरवाडी रोडवर विनापरवाना देशी दारूच्या ९६ सीलबंद बाटल्या व एक मोटार सायकल ताब्यात घेऊन दोन जणांवर सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ श्रीकांत सुदर्शन पालेपवार (वय ३२ रा.सोनई ता. नेवासा)

रणजीत बाबुराव झाडगे (वय ४० रा. सोनई ता.नेवासा) या आरोपींकडून पाच हजार सातशे साठ रुपये किमतीची देशी संजीवनी संत्रा कंपनीची १८० मिली च्या ९६ सीलबंद कॉटर साईज बाटल्या विनापरवाना बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने सापडल्या

व दहा हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच १७ एएफ ०६६० असा एकूण १५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

सोनई पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गर्जे हे करत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office