अहमदनगर बातम्या

छे..छे..छे..गोदावरी गंगामाईला त्या शहरात गटारगंगेच स्वरूप

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-देशाची दक्षिणकाशी असलेली उत्तरवाहिनी गोदावरी नदीचे पात्रात घाणीचे सम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चांगदेव महाराज समाधी मंदिर परिसर दूषित झाला असून रक्षा विसर्जनासाठी योग्य व्यवस्था करावी तसेच याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील भाविकांनी केली आहे.

श्रीक्षेत्र पुणतांबा गोदावरी नदीचे पात्रातील साचलेले डबके दुर्गंधीयुक्त झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात खराब कपडे, गोण्या, नदीत विसर्जित होणारे साहित्य यामुळे घान साचून सडत आहे.

त्यामुळे डबक्यातील पाण्यातून दुर्गंधी येत आहे. येथे विविध स्वरूपातील विधी केले जातात. दैनंदिन विधी करणारांची संख्या वाढत आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने केटीवेअर बंधार्‍या खालील सर्व पात्र कोरडे पडले आहे.

परंतु बंधार्‍याच्या लिकेजमधून जे पाणी येते त्यातून लहान-मोठे पाण्याचे प्रवाह तयार होऊन पाणी वाहते आहे. परंतु याचा पाण्याच्या डबक्यातील घाणीवर काही परिणाम होत नाही.

कारण या पाण्याच्या प्रवाहाला वेग नसल्यामुळे टाकलेली घाण साचून राहते. ती तेथेच सडते. त्यामुळे पाण्याला मोठी दुर्गंधी येत आहे. याचा त्रास भाविकांना होत आहे.

नदीपात्रात स्वच्छता राहण्यासाठी विविध विधी करण्यासाठी येणार्‍या भाविकांकरिता स्वच्छतेचे काही सुचना फलक लावावेत, रक्षा विसर्जन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करावी,

विविध विधी करण्यासाठी येणार्‍या महिलांना कपडे बदलण्याची तात्पुरती व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी अशी मागणी भाविकांनी केली आहे.

या ठिकाणी गोदावरी पात्रात लोकांकडूनच नदीपात्रात घाण टाकली जाते. नागरिक सांगतात स्थानिक प्रशासनाकडून स्वच्छेतेबाबत ठोस कार्यक्रम नाही त्यामुळे आम्हाला नाइलाजाने हे करावे लागत आहे.

Ahmednagarlive24 Office