अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवा, मास्क वापराबाबत जनजागृती करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिली. दरम्यान, कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून १२० नवे पॉझिटिव्ह आढळून आले.
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यावेळी उपस्थित होते.
१४४ रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५ हजार ६५५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ११३२ झाली.
खासगी प्रयोगशाळेत ४३, अँटीजेन चाचणीत ७७ बाधित आढळले. खासगी प्रयोगशाळेतील रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील १३, अकोले २, जामखेड १, कर्जत १, नगर ग्रामीण ४, नेवासे १, पारनेर ४, पाथर्डी २, राहाता ३, राहुरी २, संगमनेर ४, श्रीरामपूर १ रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत मनपा १३, कर्जत ४, कोपरगाव ३, नगर ग्रामीण १, पाथर्डी १४, राहाता ९, संगमनेर १५, शेवगाव ७, श्रीगोंदे ६, श्रीरामपूर २ रुग्णांचा समावेश आहे.