Ahmednagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिवसभर शिर्डी मतदारसंघात ठाण मांडून होते. त्यांनी महायुतीतील सर्वच घटक पक्षातील कार्यकर्ते, महत्वाचे राजकीय पदाधिकारी, विविध संघटना व असोसिएशन यांच्यासह बचत गटातील महिलांशीदेखील संवाद साधला.
विशेष म्हणजे बैठकीत आपण मुख्यमंत्री असल्याचा कोणताही बडेजाव याठिकाणी दिसून आला नाही. त्यांचा कामाचा झपाटा पाहून सर्वच जण आश्चर्यचकीत झाले. अर्ज भरल्यानंतरच्या सभेनंतर ते एका आठवड्यात दुसऱ्यांदा शिर्डीत आले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, बबनराव घोलप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे,
भाऊसाहेब कांबळे, विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, बापुसाहेब कोते, अनुराधा अदिक आदी नेते उपस्थित होते.
शिर्डी येथे या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना व पदाधिकारी यांच्याशी त्यांनी यावेळी चर्चा केली. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी पतसंस्थांच्या विविध अडचणी मांडल्या.
डॉ. धनंजय धनवटे यांनी महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाकडून होणाऱ्या त्रासाचा पाढाच कथन केला. वकील संघटनेचे रवि किरण यांनी राहुरी येथील आढाव दाम्पत्याच्या खुनाचा हवाला देत अॅडव्होकेट प्रोटेक्शन अक्ट लागू करण्याची मागणी केली.
पेन्शनधारक संघटनेनेदेखील निवेदन दिले. सिंचनाचे प्रश्न आपण निकाली काढणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. मुळा नदी पट्ट्यातील शेतकरीदेखील आमदार दराडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, आण्णासाहेब म्हस्के, मनसेच जिल्हाप्रमुख बाबा शिंदे, शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शिवाजी धुमाळ, जालिंदर वाकचौरे, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीनराव औताडे आदींनी यावेळी आपले वित्चार मांडले
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. सुरुवातीला खासदार सदाशिव लोखंडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली, या चर्चेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलदेखील सहभागी झाले.