Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे शेतात गेलेल्या एका शाळकरी मुलाचा विहिरीत पाय घरून पडल्याने मृत्यू झाला.
ओम योगेश काळे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता सहावीत शिकत होता.त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
राहुरी तालुक्यातील चिंचोली तांभेरे शिवारात शेलार वस्तीजवळ योगेश बाबासाहेब काळे यांची शेती असून त्या शेतात पाण्यासाठी बोअर घेण्याचे काम चालू होते.
त्या ठिकाणी वडिलांना पिण्यासाठी पाणी घेऊन बोअर चालू असलेल्या ठिकाणीयोगेश यांचा मुलगा ओम योगेश काळे हा जात होता. संध्याकाळी अंधार झाल्याने शेजारीच असलेल्या विहिरीत त्याचा पाय घसरल्याने तो विहिरीत पडला.
या विहिरीला कठडे नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.मुलगा विहिरीत पडल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली;
परंतु त्यांना त्यात यश आले नाही. त्यानंतर मोटारीने पाणी उपसून या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत्यू झालेला मुलगा ग्रामपंचायत सदस्य सीमा काळे यांचा मुलगा आहे.