विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातल्या टाकळिमियाँ शिवारात एका तुडूंब भरलेल्या विहिरीत देवळाली प्रवरा येथील अक्षय रविंद्र ढूस या तरूणाचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. तो विहिरीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यूचे झाला. या घटनेमुळे देवळाली परिसरात शोककळा पसरली.

विहीर काठोकाठ भरलेली असल्याने त्याचा मृतदेह शोधण्यासाठी विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करण्यात आला.

तब्बल साडेचार तासानंतर मृतदेह वर काढण्यात आला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24