बुलेटच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकलची धडक लागल्याने संभव दत्तु गव्हाणे (वय ७ वर्षे) या चिमुकल्याचा जबर मार लागून मृत्यू झाला.

ही घटना नगर तालुक्यातील अरणगाव येथे घडली. याबाबत तेजस पोपट पुंड या मोटारसायकल चालकावर नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील अरणगाव येथील तेजस पोपट पुंड हा त्याच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकल (एमएच१६ बीई ३०३३) हिच्यावरून गावातील मारूती मंदिराकडून महादेव मंदिराकडे जात होता.

यावेळी भरधाव वेगात मोटारसायकल चालवून रोडच्या कडेला खेळत असलेल्या संभव दत्तु गव्हाणे (वय ७ वर्षे) या चिमुकल्याला बुलेटची जोराची धडक दिली. यात संभव हा जबर जखमी होवून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत दत्तु भानूदास गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी तेजस पोपट पुंड (रा.अरणगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, याबाबत अधिक तपास पोहेकॉ.लबडे हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24