अहमदनगर बातम्या

चित्रा वाघ यांची डरकाळी… म्हणाल्या महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- आपल्या आक्रमक भूमिका व परखड मतांनी विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या चित्रा वाघ यांनी आपली शाब्दिक डरकाळी फोडली आहे. सरकारची कमेंट्मेट फक्त सत्तेशी आहे.

त्यांना सामान्य जनतेशी काहींच घेणे-देणे नाही. सरकारचा धिक्कार केला, काही केले तरी त्यांना फरक पडत नाही. ते गेंड्याच्या कातडीचे असल्याची टिका भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.

राज्य शासनाचा पोलिसांवर वचक राहिला नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पारनेर तालुक्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून किलयुगाची घटना घडली होती.

पिडीत मुलीच्या कुटूंबियांची वाघ यांनी नुकतीच भेट घेतली. यानंतर नगरमध्ये आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, रोजच कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहे.

सरकार मात्र सेलिब्रिटींच्या मुलांच्या अटकेबाबत चर्चा करीत आहे. त्याचा ऊहापोह केला जातो. गरिबांच्या मुली, बहिणींची अब्रू वेशीला टांगली जाते, याचे सरकारला काहीच देणे-घेणे नाही. अशी टिका वाघ यांनी केली.

Ahmednagarlive24 Office