अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात बिनतारी संदेश कक्षात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार संजूबाबा किसन गायकवाड
यांची रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट (क्रमांक एमजेएफ २६९७) नेवासा फाटा येथील सुयोग मंगल कार्यालयासमोरील त्यांच्या रहात्या घरासमोरुन चोरीला गेली आहे.
याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की संजय किसन गायकवाड (वय ४६, रा. सुयोग मंगल कार्यालयासमोर, नेवासा फाटा) यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
दरम्यान पोलीस हवालदार संजय गायकवाड हे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बिनतारी संदेश कक्षात नेमणुकीस असताना हा प्रकार घडला आहे.
दरम्यान त्यांच्या बुलेटची अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन पोबारा केला. या घटनेची माहिती पोलिस हवालदार गायकवाड यांना झाल्यानंतर अनेकांकडे बुलेटची चौकशी केली; मात्र ती मिळून न आल्यामुळे बुलेट चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.