अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र बंद असल्याने यंदाचे सण,समारंभ,उत्सव ही लिमिटेड झाले आहेत.शासनानेही मंदिरही बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरेही बंद आहेत.
आजचा अवघ्या महाराष्ट्राचा असलेला आषाढी एकादशीचा उत्सव,दिंडी सोहळेही रद्द केल्याने भाविकांची मोठी निराशा झाली आहे.
नेप्ती गावात आषाढी एकादशीनिमित्त नर्मदेश्वर मंदिर प्रदक्षिणा घालून कोरोना पासून मुक्ती देण्याचे साकडे श्री विठ्ठलास घालण्यात आले.
नेप्ती येथील नर्मदेश्वर मंदिराच्या वतीनेही आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
आज आषाढी एकादशीनिमित्त सकाळी अभिषेक करुन, पादुकांचे पुजन करुन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली.
याप्रसंगी वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव,हभप संजय महाराज महापुरे,हभप झुंबर महाराज आव्हाड,हभप रामदास महाराज शेटे,बाबासाहेब गोलांडे,
नगरसेविका सुवर्णा जाधव,दत्ता जाधव आदि उपस्थित होते.यावेळी महिलांनी डोक्यावर कलश,तुळस,टाळ-मृदूंगाच्या विठ्ठल नामाचा गजरात ही मंदिर प्रदशिक्षणा घालण्यात आली.
याप्रसंगी वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव म्हणाले,प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज आषाढी एकादशीनिमित्त मोजक्या भाविकांच्या उपस्थितीतून मंदिर प्रदशिक्षणा घालण्यात आली.
त्यानंतर या पादुका पूजन करण्यात आले व लवकरात लवकर या कोरोनातून मुक्ती मिळवून पुन्हा आषाढी दिंडी व सोहळ्यांचे आयो जन करण्याचे साकडे विठ्ठल-रुख्मिणीला घालण्यात आले.
यावेळी हभप संजय महाराज महापुरे म्हणाले,यंदा दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असला तरी पंढरपुरच्या मंदिर समितीच्यावतीने भाविकांना घरबसल्या ऑनलाईन दर्शन सोहळ्या चे आयोजन केले आहे.
भाविकांनीही आषाढानिमित्त या ऑनलाईन विठ्ठल-रुख्मीणीचे दर्शन घेऊन आपली भक्ती अर्पण केली आहे.
देवाचे अस्तित्व सर्वत्र असल्याने आपण प्रत्येकांने घरात राहूनच पूजा करावी.लवकरच या कोरातून विठ्ठल-रुख्मीणी आपल्याला मुक्त करेल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews