अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे नगर तालुक्यातील अनेक गावांत आठवडे बाजार बंद करण्यात आले होते. त्यातील काही बाजार चालू झाले. मात्र, गुंडेगावचा आठवडे बाजार अद्याप सुरू न केल्याने येथील शेतकरी व गामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.
ग्रामपंचायतीने आठवडे बाजार तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. गुंडेगाव बाजारपेठेत उलाढाल मोठी होते.
कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून गुंडेगाव येथील आठवडे बाजार बंद असल्याने येथील शेतकऱ्यांचा माल बाहेरचे व्यापारी अगदी कमी दराने खरेदी करून,ज्यादा दराने विक्री करीत आहेत.
कोरोनाच्या काळात शेतमाल विकू न शकल्याने हा माल शेतात नासून गेला. किमान आठवडे बाजार चालू झाल्यास शेतकऱ्यांना पालेभाज्या विकून त्यातून चार पैसे मिळवता येतील.
परंतु आठवडे बाजार सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे गावातील आठवडे बाजार सुरू करणे गरजेचे झाले आहे. सोशल डिस्टन्सचे पालन करून आठवडे बाजार तत्काळ चालू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved