अहमदनगर बातम्या

नगरकरांनो खबरदारी घ्या; गणेशोत्सवात साथीचे आजार वाढले, वैद्यकीय तज्ञांनी केले ‘हे’ आवाहन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :सध्या वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम झाल्याने साथीचे आजार वाढले आहेत. ऐन गणेशोत्सवामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ऐन गणेशोत्सवात नगर शहरात घसा, सर्दी, खोकला व तापाची साथ सुरू झाली आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी वाढली आहे.

मागील काही दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता त्यामुळे अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तसेच या पावसाने शेतकऱ्यांचे खरीपाची पिके पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र सध्या पाऊस थांबला असून आता आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.

राज्यभर मोठ्या उत्साहात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र ऐन गणेशोत्सवात नगर शहरात घसा, सर्दी, खोकला व तापाची साथ सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी वाढली आहे. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम झाल्याने साथीचे आजार वाढले आहेत.

नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नगर शहरात काही दिवसांपासून पावसाचा खेळ सुरू आहे. वातावरणातील या बदलाचा आरोग्यावर परिणाम आहे. आधीच शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकणगुनिया या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला होता.

त्यामुळे अनेकजण अद्याप उपचार घेत आहेत. आता परत घसा खवखवणे, खोकला, डोकेदुखी व तापाची साथ सुरू आहे. डेंग्यू, चिकणगुनिया या आजारांच्या रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी त्या सदृश्य तापाने नागरिक हैराण झाले आहेत.

खासगी रुग्णालयांची ओपीडी फुल्ल झाली आहे. अनेक रुग्णांना सलाईन लावल्याचे निदर्शनास येत आहे. वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार वाढल्याचे वैद्यकिय तज्ञांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, सध्याचा काळ हा रोगराईचा असल्याने ताप, थंडी, सर्दी, खोकला यासह संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका आहे.

या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी गर्दीमध्ये जाताना नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन वैद्यकीय तज्ञांकडून करण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office