अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- दिवाळीनंतर सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु झाले असून, शहरापेक्षा गावांमध्ये रात्रीच्या वेळी अधिक थंडी जाणवत आहे.
त्यात डासांच्या संखेत लक्षणीय वाढ झाल्याने संध्याकाळ होताच शहरातील नागरिकांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. शहरात अनेक परिसरातील डासांचा प्रचंड प्रकोप वाढला आहे.
त्यामुळे डेंग्यू व मलेरिया असे साथीचे रोग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचशा भागातअद्याप डास प्रतिबंधक फवारणी केलेली नसल्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्तीझालेली आहे.
ही उत्पत्ती साचलेले पाणी व अस्वच्छतेमुळे होते. पाण्याचा निचरा व्यवस्थीत न झाल्यास त्याचे डबके तयार होतात तसेच अनेक ठिकाणी झाडे झुडपे व गवत वाढलेले आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष व साचलेले पाणी डासांच्या निर्मितीस कारणीभूत ठरत आहे.
हिवाळ्यात डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकत्रस्त असून डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
डासांचा त्रास वाचवण्यासाठी थंडीच्या दिवसात ही पंख्याचा वापर करावा लागतो, परंतु सध्या ग्रामीण भागात सुरु असलेले वीजेचे भारनियमन व वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठ्यामुळे खूप व्यत्यय येत आहे.
रस्त्याकडेच्या उघडे ड्रेनेज आरोग्यास धोकादायक ठरत असून, डासांच्या उत्पत्तीची ही उगमस्थान नष्ट करणे गरजेचे आहे अथवा मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगांचा फैलाव होऊ शकतो.
ऋतुबदलामुळे सर्दी, खोकला व त्यातून होणारे संसर्गजन्य आजारही वाढले आहेत. त्याचा परिणाम लहान मुले व वृद्धांवर जाणवत आहे.