Ahmednagar News : सदयस्थितीत झिका विषाणुजन्य आजाराचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण राज्यातील काही भागामध्ये वाढलेले आहे. डासांमार्फत पसरणाऱ्या झिका या विषाणुजन्य आजाराची सध्या सर्वसामान्यांमध्ये भीती आहे. सध्या या आजाराचे आतपर्यंत पुणे, नाशिक, कोलाहपूर,सांगली आदी ठिकणी रुग्ण आढळून आले आहेत.
ही रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागामध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान आता अहमदनगर जिल्हयातील संगमनेर शहरामध्ये आतापर्यंत या विषाणुची बाधा झालेली तीन रुग्ण आढळुन आलेले आहेत.
या बाबत जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारीआशिष येरेकर यांनी आढावा घेऊन सर्व संबंधीत यंत्रणांना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्या बाबत सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून या आजार नियंत्रणासाठी आवश्यक उपाच केल्याचा दावा केला जात आहे.
झिका हा विषाणुजन्य आजार असुन सदर आजाराचा प्रसार एडिस जातीच्या डासामुळे होतो. आतपर्यंत या आजाराचे नाशिक,पुणे,कोल्हापूर, सांगली, नागपूर यासह इतर ठिकाणी देखील रुग्ण आढळून आले होते.
मात्र आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर संगमनेर शहरामध्ये आतापर्यंत या विषाणुची बाधा झालेली तीन रुग्ण आढळुन आलेले आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले असून, आवश्यक त्या खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एडिस जातीचा डास दिवसा चावा घेतो, एडिस जातीचा डास झिकाबरोबर डेंग्यु, चिकुनगुनिया इत्यादी आजारांच्या प्रसारास कारणीभुत असतो. झिका विषाणुजन्य आजारामध्ये प्रामुख्याने ताप, डोळे लाल होने, सांधे दुखी, डोके दुखी, अंग दुखी व अंगावर लाल पुरळ येणे अशी सौम्य लक्षणे दिसतात.
सौम्य लक्षणे दिसत असली तरीही गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.कारण यामुळे गर्भवती स्त्रीयांमध्ये होणा-या बाळास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामध्ये प्रामुख्याने डोके लहान असने, मेंदुची वाढ खुंटने किंवा डोळयाचे विकार, ऐकु न येणे, अवयावांचे जन्मतःव्यंगत्व होण्याची शक्यता असते.
काय करावे : आठवडयातुन एक कोरडा दिवस पाळावा, पाणी साठवलेल्या भांडयांना व्यवस्थित झाकुण ठेवावे.घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराभोवती किंवा छतावर टाकाऊ साहित्य ठेऊ नये (जुने टायर, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंटया इत्यादि) अंगभर कपडे घालावेत, मच्छरदानीचा वापर करावा,डास प्रतिरोधक लिक्वीड किंवा क्रीमचा वापर करावा.
काय करु नयेः वरील लक्षणे दिसल्यावर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.ताप आल्यावर ऑस्पिरीनची गोळी घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा. झिका विषाणू प्रादर्भाव असलेल्या ठिकाणी प्रवास टाळावा.
सदर विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभाग यांच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय योजना (जलद ताप सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, धुर फवारणी इत्यादी) करण्यात येत आहेत. तरीही नागरीकांनी सदर विषाणू प्रादर्भावास प्रतिबंध करण्यासाठी खबरदरी घेणे आवश्यक आहे.
या बाबत जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारीआशिष येरेकर यांनी आढावा घेऊन सर्व संबंधीत यंत्रणांना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्या बाबत सुचना दिल्या आहेत. अशी माहिती डॉ.बापुसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य आधिकारी यांनी दिली आहे. तरीही नागरीकांनी घाबरुन न जाता जवळच्या शासकिय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.असे आवाहन करण्यात आले आहे.